24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रआ. बबनदादा शिंदे, राजन पाटील भाजपच्या वाटेवर?

आ. बबनदादा शिंदे, राजन पाटील भाजपच्या वाटेवर?

एकमत ऑनलाईन

उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटले, राष्ट्रवादीला बसू शकतो धक्का
मुंबई : सोलापुरात भाजपकडून पक्ष वाढीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील दुर्लक्षित राजन पाटलांसह आमदार बबनराव शिंदेंना पक्षात घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने आज माढा मतदारसंघाचे बबनराव शिंदे आणि राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राजन पाटलांच्या दोन्ही मुलांना राजकीयदृष्ट्या सेटल करण्यासाठी त्यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी चर्चा सोलापुरात सुरू आहे.

राजन पाटील यांनी मोहोळमधून आमदारकीची हायट्रिक केली आहे, तर मतदारसंघ राखीव होताच राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराला तिस-यांदा निवडून आणण्याची कमाल देखील त्यांनी केली आहे. यामुळे त्यांचे तालुक्यातील प्राबल्य लक्षात घेत भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून येत्या काळात हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी राष्ट्रवादीची साथ सोडली तर सोलापूरमधील माहोळसह ग्रामीण भाग राष्ट्रवादीच्या हातून गेला असे म्हणता येऊ शकते. राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील आणि विक्रांत (बाळराजे) पाटील हे भाजप प्रवेशासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढवून राजन पाटील व त्यांचे चिरंजीव विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी सलग ३० वर्षे वर्चस्व कायम राखले.

भाजपकडून दबावतंत्र
राजन पाटील शरद पवारांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्यासाठी शरद पवारांनी २ दिवसांपूर्वी बैठक घेतली, तरीही त्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन तसे संकेत दिले. हे नेते भाजपवरच्या प्रेमाने तिकडे जात नाहीत तर भाजप दबावतंत्राचा वापर करत आहे. आ. शिंदे यांना नुकतीच ईडीची नोटीस बजावली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या