29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्रआ. बांगर यांच्या गाडीवर हल्ला

आ. बांगर यांच्या गाडीवर हल्ला

एकमत ऑनलाईन

अमरावती : एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मूळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे हल्ला करण्यात आला.

आमदार संतोष बांगर अमरावती येथील अंजनगावसुर्जी येथे गेले असताना त्यांच्यावर स्थानिक शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा देत हल्ला करण्यात आला. या घटनेचे व्हीडीओ देखील व्हायरल झाले आहेत. मागील अनेक दिवसांपासून संतोष बांगर हे चर्चेत आहेत. बांगर हे सुरुवातीला शिवसेना गटात होते. मात्र ऐनवेळी ते शिंदे गटात सामील झाले. तसेच त्यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शनदेखील केले होते. या व्यतिरिक्त ते उद्धव ठाकरे गटावर टीका करताना देखील दिसून आले होते. शिंदे गटाच्या नेत्यावर हल्ला होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याआधी उदय सामंत याच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाला होता. त्यामुळे भविष्यात हा संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत.

पत्नी, बहीण सोबत नसती तर दाखवले असते
दरम्यान, माझी पत्नी आणि बहीण गाडीमध्ये होती. काही कार्यकर्ते गाडीसमोर आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. माझी पत्नी आणि बहीण सोबत नसती, तर त्यांना दाखवले असते की संतोष बांगर काय आहे, अशा कडक शब्दात संतोष बांगर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली. माझ्यासोबत पत्नी आणि बहीण असल्याने मला गाडीच्या खाली उतरता आले नाही. नाही तरी त्यां

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या