पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पूजा चव्हाणचा मृत्यू हा आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू झाला आहे, असा रिपोर्ट पुणे पोलिसांनी दिला.
बंजारा समाजाचे महंत आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने पुण्याच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पूजाचा मृत्यू अपघाती किंवा आत्महत्या असल्याचे नमूद केले आहे, असा दावा शिष्टमंडळाने केला आहे.