29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रआ. राणेंना तूर्त दिलासा सोमवारी फैसला, तोपर्यंत अटक होणार नाही

आ. राणेंना तूर्त दिलासा सोमवारी फैसला, तोपर्यंत अटक होणार नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पूर्ण झाली. मात्र, न्यायालय याप्रकरणी सोमवारी आपला फैसला सुनावणार आहे. हा निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. शिवेसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील झालेल्या हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत.

सोबतच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानादेखील नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विधानभवनाच्या पाय-यावर बसून म्यॉव म्यॉव करत खिल्ली उडवली होती. या दोन्ही घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने आज न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर न्यायालय सोमवारी आपला निकाल देणार आहे. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याशी नितेश राणे यांचा संबंध असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता.

आमदार नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत आले होते. त्यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेऊन ते गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात होते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी ते अज्ञातवासातून बाहेर आल्याचे आढळून आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या