36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रदिलासादायक! राज्यात आज दिवसभरात 14, 219 रूग्ण कोरोनामुक्त

दिलासादायक! राज्यात आज दिवसभरात 14, 219 रूग्ण कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारतर्फे प्रयत्न सुरु आहेत. आज १४,२१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यासंदर्भातील माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५,०२,४९० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.४७ % एवढं झालं आहे. राज्यात सध्याच्या घडीला एकूण १,६८,१२६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात आज ११,०१५ नवीन रुग्णांचं निदान करण्यात आलं आहे. तर २१२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ % एवढा आहे . आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६,६३,४८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,९३,३९८ (१८.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांवर सरकारी आणि खाजगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात १२,४४,०२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,९२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशात रुग्णसंख्या ३१ लाखांवर; आणखी ६१ हजार रुग्ण वाढले

देशात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच मागील २४ तासांत ६१ हजार ४०८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे, तर ८३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ११ ऑगस्टनंतर पहिल्यांदा देशात कोरोनामुळे होणा-या मृत्यूंची संख्या ९०० पेक्षा कमी नोंदवली गेली. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ५७ हजार ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोना चाचण्यामध्ये वाढ झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ लाख ६ हजार ३४९ इतकी झाली आहे. यामध्ये २३ लाख ३८ हजार ३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ५७ हजार ५४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल साडेचार लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली, तर यादरम्यान ६ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यूही झाला.

राज्यात ५ लाख रुग्णांची कोरोनावर मात

कोरोनाचा संसर्ग कमी होत नसला तरी कोरोनातून बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात राज्यातील १४ हजार २१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५ लाख २ हजार ४९० झाली आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात ११ हजार १५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४७ % एवढे झाले आहे. दरम्यान, कोरोनाबधितांची एकूण संख्या ६ लाख ९३ हजार ३९८ झाली आहे, तर १ लाख ६८ हजार १२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज दिवसभरात २१२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या २२ हजार ४६५ झाली आहे.

‘मनरेगातून ग्रामविकास’ साधण्यासाठी सरपंचांना मिळणार प्रशिक्षण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या