22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रप्रथमच ३६ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त

प्रथमच ३६ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

२४ तासांत सर्वाधिक डिस्चार्ज, आणखी ४८ हजार रुग्णांची भर

नवी दिल्ली : भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. २४ तासांत तब्बल ४८ हजार ६६१ नवीन रुग्ण सापडले, तर ७०५ जणांचा मृत्यू झाला. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे जितका कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे, तितकेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. भारतात प्रथमच २४ तासांत तब्बल ३६ हजार १४५ पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट ६४ टक्क्यांवर गेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. त्यामुळे कोरोनाला हरवणे शक्य आहे, हे या रिकव्हरी रेटवरून दिसून येते.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ झाली आहे. यातील ४ लाख ६७ हजार ८८२ रुग्ण सक्रीय आहेत, तर, ८ लाख ८५ हजार ५७७ रुग्ण निरोगी झाले आहेत. ३२ हजार ०६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, महिनाभरात ही संख्या कमी व्हायला लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, कोरोना हा काही लगेच जाणारा आजार नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून, हा टास्क फोर्स उपचाराची दिशा, औषध, नव्या आरोग्य सुविधा, संशोधनासाठीचे उपाय, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, अर्थचक्र पुन्हा रुळावर आणणे अशा सगळ््याच गोष्टींचा अभ्यास करणार असून, हे तज्ज्ञ शिफारशी करणार आहेत. त्यानंतर सरकार प्रत्येक विभागासाठी दूरगामी निर्णय घेणार आहे.

भारताचा रिकव्हरी रेट जगात सर्वांत जास्त
भारताचा रिकव्हरी रेट जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे, तर मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. मात्र, असे असले तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. आपल्याला खूप जास्त सावधान राहावे लागणार आहे.

राज्यात पावणेचार लाख रुग्ण
राज्यात रविवारी तब्बल ९ हजार ४३१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर २६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३ लाख ७५ हजार ७९९ वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या १ लाख ४८ हजार ६०१ जणांचा व आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या २ लाख १३ हजार २३८ जणांचा समावेश आहे. राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्क्यांवर आले आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Read More  लातूर जिल्ह्यात सापडले आणखी ६८ रुग्ण

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या