24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रआयुक्त तुकाराम मुंढे : मला फौजदारी कारवाई करण्यासाठी मजबूर करू नका

आयुक्त तुकाराम मुंढे : मला फौजदारी कारवाई करण्यासाठी मजबूर करू नका

एकमत ऑनलाईन

नागपूर : कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता मला फौजदारी कारवाई करण्यासाठी मजबूर करू नका असा विनंती वजा इशारा नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता प्रदान केल्यापासून नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर संपूर्ण शहर कोरोनाच्या विळख्यात जाईल अशी भीती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे व प्रतिबंधित क्षेत्रातील नियमांचे पालन न केल्याने शहरात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

बुधवारी एकाच दिवसात कोरोनाचे 86 नवे रुग्ण समोर आले आहे. एक दिवसातील कोरोनाचा हा उच्चांक ठरला आहे. याचबरोबर नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या नऊशे पार गेली आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिक पालन करीत नाहीत, जर असेच राहिले तर कोरोना रुग्ण गुणाकार होण्याचे प्रमाण वाढेल व संपूर्ण शहर कोरोनाच्या विळख्यात जाईल असा इशाराही मुंढे यांनी यावेळी दिला आहे. जर शहराला कोरोनाच्या विळख्यात जाण्यापासून वाचवायचे असेल तर नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंतीही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे.

Read More  15 जूनपासून संपुर्ण देशात पुन्हा कडक ‘लॉकडाऊन’ ? मोदी सरकारनं केला खुलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या