29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्ररेमडेसीवीरच्या पुरवठ्यास कंपन्यांचा नकार

रेमडेसीवीरच्या पुरवठ्यास कंपन्यांचा नकार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने इंजेक्शन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. पण पुरवठादारांनी इंजेक्शन देण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारला ६५४ रुपये दराने रेमडेसीवीर इंजेक्शन हवे आहे. पण खुल्या बाजारात बाराशे रुपये किंमत असताना कंपनी सरकारला रेमडेसीवीर द्यायला इच्छुक नाहीत.

राज्यात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दुसरीकडे रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनला तुटवडा सुद्धा जाणवू लागला आहे. अशातच राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. ८.५० लाख रेमडेसीवीर खरेदी टेंडर पुढे ढकलण्यात आला आहे. इंजेक्शनचा पुरवठा करण्यास कोणताही पुरवठादार तयार नाही. राज्य सरकारने ज्या दरात मागणी केली आहे, त्या दरात द्यायला कंपन्या तयार नाहीत म्हणून १२०० रुपयांना इंजेक्शन घ्या, अशी भूमिका कंपन्यांनी घेतली आहे.

कच्या मालाचे भाव वाढले आहे, त्यामुळे कमी दरात देणे शक्य नाही, असेही कंपन्यांनी सांगितले. बाजारात आम्ही १२०० रुपयांना विकतो तर सरकारला कमी दरात कसे देणार, आता उत्पादन कमी आहे जेंव्हा ६६० रुपये दराने दिला. त्यावेळी कंपनीकडे साठा पडून होता, असेही या कंपन्यांचे म्हणणे आहे.

उद्योग विश्वाने लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे – सुभाष देसाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या