मुंबई : चार दिवसांपूर्वी भाजपच्या श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबत बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण फसवणूक झालेल्या महिलेने श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर श्रीकांत देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडण्यास भीती वाटत असल्याचे पीडितेने राज्य महिला आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.
मेलद्वारे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पीडितेने माझ्यासहीनिशीची तक्रार दखल पात्र गुन्हा म्हणून नोंद करण्याबाबत संबंधित पोलिसांना योग्य ते निर्देश द्यावेत किंवा माझी तक्रार नोंदवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. मला फसवणारी संशयित व्यक्ती ही आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या अतिशय बलाढ्य आहे. त्यामुळे मला बाहेर जाऊन तक्रार देण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित फिर्याद ईमेलद्वारे देखल करण्त असल्याचे नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, पीडितेच्या या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.