पुणे : अभिनेत्री उर्फी जावेदविरोधात पुण्यात तक्रार दिली आहे. उर्फीच्या कपड्यांवरून तिच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यात सध्या वाक्युद्ध सुरू आहे.
पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात उर्फीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिपाइं महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस अर्चिता जोशी यांनी ही तक्रार दाखल केली असून, सायबर अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असे म्हटले.