24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईसह ६ जिल्ह्यांत चिंता

मुंबईसह ६ जिल्ह्यांत चिंता

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईसह राज्यातील ६ जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे टेस्टची संख्या वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. विशेषत: आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोप-यातून १५ लाख भाविक एकत्र येण्याचा अंदाज आहे. या वारीवर कोणतेही बंधन नाही. पण सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन त्यात सहभागी झाले पाहिजे, असे टोपे म्हणाले.

मुंबई पुणे, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने टेस्टची संख्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. काल रविवार असल्याने टेस्ट कमी झाल्या, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जवळपास ३ ते ८ टक्के पॉझिटिव्हिटी रेट असल्याने खबरदारी म्हणून टेस्टची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मास्कसक्ती नाही
रुग्ण वाढत असले तरी त्यात काळजीचा विषय नाही. कारण सिव्हेरिटी नाही, यामुळे मास्क सक्ती नसली तरी लोकांनी स्वत:हून मास्क लावायला हवे, असे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क न घालणा-यांना तो घालावा असे समजून सांगावे. मात्र त्यांच्याकडून दंड वसूल करू नये, असे सांगितले.

यंदा वारी होणारच
मनोरंजन क्षेत्रातील लोक एकत्र आले असता त्यातील अनेक जण कोरोना बाधित झाले. यामुळे १५ लाख लोक वारीसाठी एकत्र येणार आहेत. त्यांनी काळजी घेऊन आपली वारी पूर्ण करावी. वारीची तयारी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वारीवर कोणतेही बंधन नसले तरी सर्वांनी काळजी घेऊन वारीत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या