र्वाधिक 13 जण हे गांधीनगर भागातील : सात रुग्ण हे रामनगर येथील आहेत
जालना : जालना जिल्ह्यात आज शनिवारी दुपारी आणखी 44 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून या वाढलेल्या संख्येमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 952 इतकी झाली आहे.
आज नव्याने आढळून आलेल्या 44 रुग्णांमध्ये तब्बल 42 जण हे जालना शहरातील असून त्यात सर्वाधिक 13 जण हे गांधीनगर भागातील आहेत.त्यापाठोपाठ सात रुग्ण हे रामनगर येथील असून सहा रुग्ण कन्हेयानगर येथील आहेत.
मोदीखाना,जिजामाता कॉलनी,नलगल्ली, तुळजाभवानी नगर मस्तगड या भागातील प्रत्येकी 2 तसेच नाथनगर, पेन्शनपुरा, युनियन बॅंक, माऊली नगर,पिवळा बंगला, भाग्यनगर,संभाजीनगर, जीइएस कॉलेज रोड या भागातील प्रत्येकी 1, चिंचखेड 1 आणि देऊळगाव राजा येथील सप्तश्रृंगी नगर येथील 1 या प्रमाणे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.
Read More टॉसिलिझीम 400 एमजी इंजेक्शनच्या काळा बाजारावर धडक कारवाई