24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रअहिल्याबाई होळकर जयंती ठिकाणी गोंधळ

अहिल्याबाई होळकर जयंती ठिकाणी गोंधळ

एकमत ऑनलाईन

चौडी : अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीच्या दिवशी अहमदनगरच्या चौंडीत सध्या हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित आहेत. याठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला आहे. यावरुन सध्या पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी पोलिसांनी जोरदार बाचाबाची झाली. शरद पवार यांनी पोलिसांच्या माध्यमातून कितीही दबाव आणला तरी आम्ही चौंडीला जाणारच, असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
बहुजनांची पो-हं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाहीत
बहुजनांची पो-ह आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर कोली आहे. पडळकर यांना पोलिसांनी रोखल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सदरील प्रतिक्रिया दिली आहे.

पडळकरांना पाच किमी आधीच रोखले
पण पडळकरांचा हाच पवित्रा रोखण्याची आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची सगळी तयारी पोलिसांनी केली होती. त्यामुळे चौंडीच्या पाच किलोमीटर आधीच पडळकरांना आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी रोखून धरलं होतं. यामुळे पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते भडकले आणि त्यांची पोलिसांसोबत हमरीतुमरी सुरु झाली. कार्यक्रम स्थळापासून काही किलोमीटरवर इतका राडा सुरु असताना तिकडे चौंडीमध्ये मात्र कार्यक्रम सुरळीत सुरु होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या