18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रआरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ; विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल आरोग्यमंत्री टोपेंनी मागितली माफी

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ; विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल आरोग्यमंत्री टोपेंनी मागितली माफी

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२५(प्रतिनिधी) आरोग्य विभागातील पदांसाठी होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द केल्यामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माफी मागितली आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीनं असमर्थता दाखवल्यामुळं आमच्यापुढे पर्याय नव्हता, असे स्पष्ट करताना उद्याच बैठक घेऊन परीक्षेची पुढील तारीख ठरवली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या गट क व गट ड वर्गातील पदांसाठी शनिवार व रविवारी परीक्षा होणार होती. पण शुक्रवारी रात्री अचानक ही परीक्षा रद्द केल्याने गोंधळ उडाला. जवळपास आठ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. अनेक विदयार्थी खबरदारी म्हणून शुक्रवारी रात्रीच परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणी पोचले होते. अचानक परीक्षा रद्द केल्यामुळे गोंधळ उडाला होता. आरोग्यमंत्री टोपे यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

राज्य शासनाची जबाबदारी केवळ प्रश्नपत्रिका तयार करण्याची होती व ते काम त्यांनी केले होते. परीक्षेच्या नियोजनांचे काम कंपनीचं होते. कंपनीनं असमर्थता दाखवल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून हा निर्णय घेतला. मात्र ही परीक्षा रद्द झालेली नाही. कंपनीनं आठ ते दहा दिवस मागितलेले आहेत. उद्याच बैठक घेऊन परीक्षेची तारीख ठरवली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या