25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज लागला. निकालानंतर काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. बारावीच्या परीक्षेत यश मिळविणा-यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच. परीक्षा भविष्यात येणा-या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणा-यांचे मन:पूर्वक अभिनंदन. यानंतर सुरू होणा-या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे.

काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बारावीची परीक्षा हे अंतिम साध्य नाही : अजित पवार
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीने कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करून जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या