23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रओवेसींची ऑफर काँग्रेसने स्वीकारली

ओवेसींची ऑफर काँग्रेसने स्वीकारली

एकमत ऑनलाईन

मुंबई : एमआयएम प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी दिलेली ऑफर काँग्रेसने स्वीकारली असून, राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमशी संवाद साधणार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज मुंबईत काँग्रेसची बैठक होतेय. या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित आहेत. या बैठकीपूर्वी पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना मतदान करू, असे वक्तव्य एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. महाराष्ट्रातील एमआयएमच्या आमदारांनाही मविआच्या नेत्यांकडून संपर्क साधण्यात आला नाही. आम्ही ३ दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका आज ओवेसी यांनी जाहीर केली.

पटोले काय म्हणाले?
ओवेसी यांच्या भूमिकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही एमआयएमशी नक्कीच संवाद साधू. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या आम्ही संपर्कात आहोत. आमचे सगळे उमेदवार हे विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय समाजवादी पक्षही आमच्यासोबत असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

उद्या होणार निर्णय
विधान परिषदेबाबत काँग्रेस उद्या निर्णय घेण्यात येणार, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. आज शिवसेनेच्या वतीने दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादीकडून एकनाख खडसेंच्या नावाची चर्चा सुरू आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या