24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रशरद पवारांना राष्ट्रपतिपदासाठी काँग्रेसचा पाठिंबा

शरद पवारांना राष्ट्रपतिपदासाठी काँग्रेसचा पाठिंबा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीची धामधूम जरा थंड झाल्यानंतर आता देशाचे लक्ष आगामी राष्ट्रपती निवडणुकीकडे लागलेले आहे. यासाठी आता सत्ताधारी आणि विरोधक दोघेही कंबर कसून कामाला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.

राष्ट्रपतिपदासाठी शरद पवारांचं नाव उमेदवार म्हणून पुढे येण्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शरद पवारांना जर राष्ट्रपतिपदाचा उमेदवार घोषित केले तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची मोट बांधण्यास पुढाकार घेतला आहे.

१५ जून रोजी दिल्लीत एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी शरद पवारांसह अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दिल्ली, केरळ, झारखंड, ओडिशा, तेलंगण, तामिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या