28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन

एकमत ऑनलाईन

पुणे : काँग्रेस पक्षाचे राजसभेचे खासदार राजीव सातव यांनी पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना सायटोमेगालो या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते.

मागील १५ दिवसांपासून खासदार राजीव सातव यांच्यावर पुणे येथील जहाँगिर रुग्णालयात उपचार सुरू होते. राजीव सातव औषधांना योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. त्यांच्यात चांगली सुधारणा होत होती व आता ते धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते मात्र असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली व रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले. काँग्रचे प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

सोमवारी हिंगोलीत अंत्यसंस्कार
सोमवार दि़ १७ मे रोजी सकाळी १० वाजता हिंगोली येथे सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी दिली.

राजीव सातव यांची राजकीय कारकिर्द
राजीव सातव यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच ते काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. राजीव सातव यांनी फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ असे चार वर्षे भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने सन २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले होते.

राहुल गांधी यांनी ट्वीट केले, “माझा मित्र राजीव सातव हरवल्याबद्दल मला फार वाईट वाटते. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना साक्षात्कार देणारे महान क्षमता असलेले नेते होते. आपल्या सर्वांचे हे खूप मोठे नुकसान आहे. शोक आणि प्रेम.”

कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट केले, “निशब्द ! आज मी माझा एक सहकारी गमावला ज्याने युथ कॉंग्रेसमध्ये माझ्याबरोबर सार्वजनिक जीवनाची पहिली पायरी टाकली होती. आज राजीव सातव यांचे साधेपणा, तळागाळातील लोकांसाठी केलेली तळमळ मी नेहमी लक्षण ठेवेन. माझ्या मित्राला निरोप! आपण जिथे आहात तिथेच रहा, चमकत रहा. ”

चक्रीवादळाचा रुद्रावतार !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या