27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रलक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपचे झुंजार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. जो सदस्य मतदान करतो, त्याच सदस्याने आपली मतपत्रिका मतपेटीत टाकावी, असा नियम असल्याचं काँग्रेसचं मत आहे.

मात्र लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्याऐवजी दुसऱ्याने त्यांची मतपत्रिका मतपेटीत टाकल्याने त्यांचं मत बाद करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरकडे तशी तक्रार केली आहे. तसेच आपल्या तक्रारीचा निवडणूक आयोगाला मेलही केला आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची मतमोजणी देखील लांबते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या