31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeमराठवाडाऔरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोधच

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोधच

एकमत ऑनलाईन

जालना: औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती सुरु नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच आहे, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे.

ते शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी काँग्रेसची भूमिका रोखठोकपणे मांडली. औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे.

आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले. तसेच औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस नेते बुटासिंग यांचे निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या