36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज, स्वबळावरच लढणार - नाना पटोले

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज, स्वबळावरच लढणार – नाना पटोले

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१६ (प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पुढील वर्षाच्या सुरुवातीला होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरवण्यासाठी काँग्रेसची बैठक आज झाली. या बैठकीत मुंबईतील वार्डनिहाय स्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक वार्डात संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे पटोले यांनी सांगितले.

बैठकीत प्रभाग पुनर्रचनेसंदर्भात चर्चा झाली. प्रभागांची पुनर्रचना करताना त्यात अनेक त्रुटी झाल्या आहेत. पुनर्रचनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यासंदर्भात जेष्ठ नेते जनार्दन चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे,असे पटोले यांनी सांगितले.

या बैठकीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, विधिमंडळ काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार अमीन पटेल, चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड, संजय निरुपम आदी उपस्थित होते.

नंदूरमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या