26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्र१७५ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपाचा दावा खोटा !

१७५ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपाचा दावा खोटा !

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा ंिजकल्याचा भाजपाचा दावा धादांत खोटा आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना घवघवीत मिळाले असून, काँग्रेस पक्षाला १७५ ग्रामपंचायतींमध्ये घवघवीत विजय मिळाला असल्याचा दावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक निकालावर भाजपाचा आयटी सेल चुकीची माहिती देत आहे. भाजपाचा मोठ्या विजयाचा दावा धादांत खोटा आहे. सर्वात जास्त जागा ंिजकल्याचा दावा करून भाजपा स्वत:च स्वत:ची पाठ थोपटवून घेत आहे. आम्ही सर्व जिल्ह्यातून माहिती घेतली असताना काँग्रेस पक्षाला घवघवित यश मिळालेले स्पष्ट दिसत आहे. काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास आहे तो त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिला आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही असेही पटोले म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या