28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रपुनर्विचार याचिकेचा विचार

पुनर्विचार याचिकेचा विचार

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शनिवारी राज्यात मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते, असे मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीत यावर विचार झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच या प्रकरणात पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्रही पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजाला मोठा धक्का बसला. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. या मुद्यावर राज्य सरकारची पुढील भूमिका काय असावी, याबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यासोबतच या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास आणि विश्लेषण करण्यासाठीही एक समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही समिती १५ दिवसांच्या आत रिपोर्ट सादर करेल. बैठकीत मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी आदी उपस्थित होते.

२०१८ ला दिली होती मंजुरी
२०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेत सामाजिक आणि शैक्षणिक रुपात मागासवर्ग अधिनियम २०१८ ला पारीत करण्यात आले. या अंतर्गत महाराष्ट्रात सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांत मराठ्यांंना १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद होती.

५० टक्क्यांहून अधिक आरक्षण झाल्याने आव्हान
दरम्यान आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाले. या विरोधात प्रथम मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली. त्यावेळी सरकारच्या बाजूने निर्णय सुनावला. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. त्यामुळे मराठा समाजात असंतोष पसरला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात आता पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते.

आता सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या