27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसला संपविण्याचा कट; यूपीए अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांची टीका

काँग्रेसला संपविण्याचा कट; यूपीए अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांची टीका

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशातून काँग्रेसला संपविण्याचा मोठा कट होत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी केला आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. यावर प्रतिक्रिया देत संजय निरुपम यांनी धक्कादायक आरोप केला आहे.

संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय निरुपम यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून, शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

याच मोहिमेअंतर्गत २३ स्वाक्ष-या असणारी चिठ्ठी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे, असेही निरूपम यांनी म्हटले आहे़

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या