27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यातील वादग्रस्त शिबीर अखेर रद्द

पुण्यातील वादग्रस्त शिबीर अखेर रद्द

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यात नवरात्रीच्या काळात आयोजित करण्यात आलेले सेक्स तंत्र शिबिर रद्द करण्यात आले आहे. या शिबिराला अनेकांनी विरोध केल्यानंतर आता अखेर हे शिबिर रद्द करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार होते.

या सेक्स तंत्र शिबिराची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्यानंतर या शिबिराला जोरदार विरोध होत होता. १ ते ३ ऑक्टोबर या काळात पुण्यात हे शिबिर होणार होते. यासाठी १५ हजार रुपये फीही आकारण्यात येणार होती. मात्र आता विरोध लक्षात घेऊन आयोजकांनी हे शिबिर रद्द केले आहे.

या शिबिराला होणा-या विरोधानंतर उत्तर प्रदेशातले आयोजक रवि सिंग यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. उत्तर प्रदेशातल्या सत्यम शिवम सुंदरम या संस्थेमार्फत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार होते. मात्र विविध राजकीय पक्षांनी याला केलेल्या विरोधामुळे हे शिबिर रद्द करण्यात आले. मात्र तरीही पोलिस या शिबिराच्या आयोजकांचा शोध घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या