मुंबई : राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये मनुस्मृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित वादग्रस्त प्रश्न काढणा-या पेपर सेटवर अखेर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने कारवाई केली.
संबंधित पेपर सेटरला निलंबित केल्याची माहिती विद्यापीठाने दिली. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पदवी परीक्षेत राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्र. २ (अ) व प्रश्न क्र. ३ (ई) या प्रश्नांवर एआयएसएफने आक्षेप नोंदविला आहे.