21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी ५ वकिलांची समन्वय समिती

मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी ५ वकिलांची समन्वय समिती

एकमत ऑनलाईन

मुंबई : एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याबाबत याचिकेवर ९ डिसेंबर रोजी सुनावणी होत आहे. यापार्श्वभुमीवर राज्यसरकारच्या वतीने पाच वकिलांंची समन्वय समिती जाहीर केली आहे. ९ डिसेंबरला याबाबत ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.

राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये अ‍ॅड. आशिष गायकवाड, अ‍ॅड. राजेश टेकाळे, अ‍ॅड. रमेश दुबे पाटील, अ‍ॅड. अनिल गोळेगावकर व अ‍ॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. याबाबत सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल, असेही चव्हाण यांनी सांगितले आहे.

भारतीय नौदलात लवकरच ‘रोमिओ’ची एन्ट्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या