30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रमंत्रालयालाही कोरोनाचा विळखा

मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज साठ हजारांच्या आसपास सापडत आहे. राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाला सुद्धा आता कोरोनाचा विळखा पडला आहे. मंत्रालयात तब्बल १०० हून अधिक कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रालयात अनेक अधिकारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. विशेष म्हणजे, मंत्रालयात गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकांना मंत्रालय प्रवेश बंद केला आहे. तरी देखील अनेक अधिकारी पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिकारी महासंघाचे सरचिटणीस विष्णू पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात शंभरपेक्षा अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असून अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे सुद्धा सांगत नाहीत. वेगवेगळया विभागात अव्वल कारकूनापासून ते सचिव दर्जाचे अधिकारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व कर्मचारी स्वतंत्र विलगीकरण तर काहीजण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती देखील पाटील यांनी दिली आहे.

मंत्रालयात कुठल्या विभागात किती रुग्ण?
महसूल विभाग – १७
गृह – ४
शालेय शिक्षण – ७
नियोजन – ६
मृदा जंलसंधारण – ७
आदिवासी विकास – ६
पर्यटन – ६
अल्पसंख्याक – ३
सार्वाजनिक बांधकाम – ८
एमपीएससी विभागात २४ आणि जलसंपदा विभाग १२ पेक्षा जास्त शासकीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

गेल्या आठवड्यात ४ शासकीय कर्मचा-यांचा मृत्यू झाला असून सध्या पॉझिटिव्ह असलेले यात कक्ष अधिकारी, सहसचिव, उपसचिव, क्लार्क सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. सध्या मंत्रालयात ५० टक्के शासकीय कर्मचारी उपस्थिती आहे. मागिल काही दिवसांपूर्वीच मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटना यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील वर्षी ज्या प्रमाणे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर न कर्मचारी उपस्थिती २० टक्­क्­यांपर्यंत आणली होती, तसाच नियम काही दिवस आणावा, यामुळे शासकीय कर्मचा-यांचा जीव धोक्यात जाणार नाही आणि त्यांच्यावरील संकट कमी होईल.

तूर्तास राज्यात सर्वत्रच कडक नियमावली सुरू असल्याने मंत्रालयात देखील अनेक जण येत नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचा-यांना काही दिवस मुभा मिळावी, अशी मागणी केल्याचे देखील अधिकारी महासंघाचे सरचिटणीस विष्णू पाटील यांनी सांगितले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंदे यांच्याशी विचारणा केली असता मंत्रालयात अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत, ही वस्तुस्थिती आहे़ यामुळेच अनेक मंत्री आता मंत्रालयात जात नाहीत, त्यांच्या शासकीय निवासस्थानातून किंवा इतर ठिकाणावरून कामकाज करत आहेत. जेणेकरून लोकांची गर्दी मंत्रालयात होणार नाही, असे मत नोंदवले आहे. मंत्रालयात मागील दोन वर्षात सुमारे १७ कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे.

शिल्लक डाळींचे लाभार्थ्यांना लवकरच वितरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या