37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रदेगाव येथील निवासी शाळेत कोरोनाचा विस्फोट; तब्बल २२९ विद्यार्थ्यांना करोनाची लागण

देगाव येथील निवासी शाळेत कोरोनाचा विस्फोट; तब्बल २२९ विद्यार्थ्यांना करोनाची लागण

एकमत ऑनलाईन

रिसोड : रिसोड तालुक्यातील देगाव येथील निवासी आदिवासी शाळेतील चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह वसतीगृहात राहणारे तब्बल २२९ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत चार शिक्षक, इतर कर्मचारी यांच्यासह २२९ विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत. सदरील वसतीगृहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणार आहेत. या विद्यार्थ्या अमरावती जिल्ह्याातील १५१, यवतमाळ जिल्ह्याातील ५५, वाशीम जिल्ह्याातील ११, बुलढाणा जिल्ह्याातील तीन, अकोला जिल्ह्याातील एक, हिंगोली जिल्ह्याातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

करोनाबाधित विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके निवासी शाळेमध्ये तैनात ठेवावीत. तसंच शाळा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे एक पथक ठेवावे. कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन गट शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

मंत्रालयातील गर्दी कमी होणार, कर्मचा-यांना शिफ्टप्रमाणे बोलावण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या