मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय म्हणून निर्बंध कडक करण्याकडे कल वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर कोरोना नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कठोर कारवाई केली जात आहे. शनिवारी दिवसभराचा आढावा घ्यायचा झाल्यास, राज्यात ६ हजार २८१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात २ हजार ५६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे़
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहिलं तर आतापर्यंत एकूण १९ लाख ९२ हजार ५३० रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण ९५.१६ टक्के इतकं आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा २.४६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५६ लाख ५२ हजार ७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ९३ हजार ९१३ (१३.३८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २८ हजार ६० व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर १ हजार ६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळाला