23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात कोरोनाचे २०,८२० सक्रीय रूग्ण

राज्यात कोरोनाचे २०,८२० सक्रीय रूग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढू लागली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६,१५९ नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान २८ मृत्यूची नोंद झाली. देशात दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हीटी दर ३.५६ टक्के इतका आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात दिवसभरात तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात २०,८२० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

यामध्ये सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबईत असून हा आकडा ६,४०९ इतका आहे. त्यानंतर पुण्याचा क्रमांक असून पुण्यात ५,३३५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात ४,०३७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर सर्वात कमी ११ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण हिंगोली जिल्ह्यात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या