32.9 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home मनोरंजन कोरोनाची लागन : महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल

कोरोनाची लागन : महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनामुळे देशात चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. मुंबईतुन एक धक्कादायक बातमी आहे की बॉलीवूड चे शहंशाह अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागन झाली असून स्वत: त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. त्यांना नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहे.

जवळपास रात्री १० च्या दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नानावटी हॉस्पिटल अमिताभ यांच्या घराच्या जवळ आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांना आणि देशातील जनतेला यामुळे मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अमिताभ बच्चन यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहे. उद्यापर्यंत त्याचे रिपोर्ट येणार आहेत. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सर्वांची आता COVID चाचणी होणार आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.अमिताभ आणि अभिषेक या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसत होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

एक कविता आपल्या ट्विटरवर पोस्ट केली

८ जुलैला अमिताभ बच्चन यांनी एक कविता आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे. ‘गुजर जायेगा, गुजर जायेगा, मुश्किल बहुत है, मगर वक्त ही तो है. जिंदा रहने का ये जो जज्बा है, फिर उभर आएगा, गुजर जायेगा, गुजर जायेगा. माना मौत चेहरा बदल कर आयी है, माना रात काली है, भयावह है, गहराई है. लोग दरवाजों पे, रास्तों पे, रुके बैठे है, कई घबराये है, सहमे है, छिपे बैठे है. मगर यकीन रख, ये बस लम्हा है, दो पल है, दो पल में बिखर जायेगा. गुजर जायेगा, गुजर जायेगा, मुश्किल बहुत है, मगर वक्त ही तो है’. या कवितेतून अमिताभ बच्चन यांनी कोरोनाच्या कठीण काळात लढण्याची जिद्द दिली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या