24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रकोरोनाने वाढवली कोल्हापूरची चिंता

कोरोनाने वाढवली कोल्हापूरची चिंता

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होताना दिसत नाही. कोल्हापूर सोबतच सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतही कोरोनाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा सुद्धा जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत नसल्याने केंद्राचीसुद्धा चिंता वाढली आहे. या संदर्भात आता केंद्रीय पथक कोल्हापूर शहरात दाखल झाले आहे.

दिल्लीहून आलेले केंद्रीय पथक आता कोल्हापूर शहरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. या दरम्यान दररोज किती टेस्टिंग होते, आरोग्य व्यवस्थेची स्थिती, आॅक्सिजनचा पुरवठा, बेड्सची स्थिती या संदर्भात केंद्रीय पथक माहिती घेणार आहे. तसेच कोविड सेंटरलाही भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ओबीसी आरक्षणासाठी केंद्राचे सहकार्य आवश्यक, भुजबळांनी घेतली फडनवीसांची भेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या