31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात कोरोना रिकव्हरी रेट ९२.४९ टक्क्यांवर

राज्यात कोरोना रिकव्हरी रेट ९२.४९ टक्क्यांवर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ९२.४९ टक्के एवढे झाले आहे. आज दिवसभरात ३००१ रुग्णांना डिस्चार्ज दिला असून आतापर्यंत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ लाख १८ हजार ३८० झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज २ हजार ५३५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ८४ हजार ३८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ४९ हजार ७७७ झाली आहे.

राज्यात आज ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. सध्या राज्यात ७ लाख ४८ हजार २२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५ हजार ३९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सिरमच्या लसीचे 6 कोटी डोस लवकरच मिळणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या