24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रनागपुरात कोरोनाचा धोका वाढला रेल्वेस्थानकावर टेस्टिंग

नागपुरात कोरोनाचा धोका वाढला रेल्वेस्थानकावर टेस्टिंग

एकमत ऑनलाईन

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या नागपुरातही वाढत आहे. यामुळे कोरोनाचा पुन्हा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी नागपुरात २९ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. शनिवारचा आकडा नागपूरकरांच्या हृदयाचे ठोके वाढविणारा आहे. आज ३४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत आहे. ही बाब लक्षात घेता पुढील धोका टाळणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना चाचणीसाठी पुढे येण्याबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

आता नागरिकही कोरोना चाचणीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये मनपाच्या कर्मचा-यांनीही पुढाकार घेतला आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान, सफाई कर्मचा-यांसह अन्य कर्मचा-यांनीही कोरोना चाचणी करून घेतली. याशिवाय कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनीही शहरातील विविध भागात असलेल्या चाचणी केंद्रांवर जाऊन चाचणी केली.

शहरात फिरणा-यांचीही चाचणी
शहरातील बाजारपेठा, रहदारीचे रस्ते, उद्यान, दुकाने, मंगल कार्यालय, खाजगी कार्यालयात काम करणा-या नागरिकांची चाचणी सर्व दहाही झोनमध्ये करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करून त्यांचे निदान करणे गरजेचे आहे. शहरात विविध ठिकाणी काम करणारे, बाजारपेठेत फिरणा-या नागरिकांमध्ये लक्षणे दिसत नसली तरी ते अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होऊ शकतो, त्यांची वेळीच चाचणी करून कोरोनावर नियंत्रण करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या