36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रपोहरादेवी महंतांसह १९ जणांना कोरोना

पोहरादेवी महंतांसह १९ जणांना कोरोना

एकमत ऑनलाईन

वाशिम : काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जाऊन दर्शन घेतले होते. यावेळी राठोड यांच्या समर्थनासाठी हजारोंच्या संख्येने लोक पोहरादेवी येथे जमले होती. राज्यात कोरोनाचे संकट असताना इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता ती शक्यता खरी ठरत असल्याचे चित्र आहे. पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण १९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाद आणि आरोपांचा सामना करणारे शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संपूर्ण प्रशासन कोरोना रोखण्याच्या प्रयत्नात असताना अशी गर्दी जमवल्यामुळे राठोड यांच्यावर चौफेर टीका आणि संताप व्यक्त होत आहे. असे असतानाच आता पोहरादेवी येथील गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कबिरदास यांच्या कुटुंबातील अन्य तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर, काही जणांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. कबिरदास महाराजांनी २१ फेब्रुवारी रोजी कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र, तरीही संजय राठोड यांचा पोहरादेवी दौरा असताना हजर राहिले. तसेच, राठोड यांच्यासोबतच ते दिवसभर होते.

 

सुपर स्प्रेडर ठरणारी ठिकाणे टार्गेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या