27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रगृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. अनिल देशमुख यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.कोरोनाच्या काळातही अनिल देशमुख यांच्या कामाचा धडाका सुरु होता. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी वेळोवेळी केले होते.

तसेच पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी ते राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलिस ठाण्यांना भेटही देत होते. त्याचबरोबर नागपूर, गडचिरोली अशा भागांचा दौराही त्यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातही त्यांची उपस्थिती असायची. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने ते सर्व प्रकारची काळजीही घेत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी करोनाची चाचणी करुन घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना तीव्र लक्षणे नसल्याने ते घरीच क्वारंटाइन होणार असल्याचे समजते.

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी ४५ दंगेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या