22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeमहाराष्ट्रआईसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना

आईसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज ठाकरे यांची आईचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे पुणे, नाशिक यांच्यासह विविध शहरांचे दौरे करत होते. यावेळी पक्षाच्या पदाधिका-यांची बैठक देखील पुण्यात पार पडली होती. मात्र आज राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज ठाकरे यांच्या घरी काम करणा-या एका सदस्याला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान शुक्रवारीच राज ठाकरे यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले होते.

मुंबईतील भांडुप येथे शनिवारी, तर रविवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, लवकरच हे दोन्ही मेळावे पुन्हा एकदा आयोजित केले जातील, असे मनसेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या