36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांनी गाठला ३०००० चा टप्पा 

महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांनी गाठला ३०००० चा टप्पा 

एकमत ऑनलाईन

मुंबई  : राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना या आजारामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात येत होता. मात्र आज सर्वाधित ६७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याची विक्रमी नोंद झाली असून राज्यात १८४२ रूग्णांचे निदान होत बाधीत रूग्णांची संख्या ३० हजार ७०६ वर पोहोचली आहे.

मागील काही दिवसांपासून या आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र ही वाढ ४५ ते ५७ या संख्येच्या प्रमाणातच होती. त्यामुळे किमान मृतकांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत होते. परंतु आज एकदम ६७ रूग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यतच्या मृतकांच्या संख्येत ११३५ वर पोहोचली आहे.
रूग्ण बरे होवून घरी जाण्यांच्या संख्येत म्हणावी तशी प्रगती नसली तरी आज ५२४ रूग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत ७०८८ रूग्ण बरे झाले आहेत.

Read More  अफवांना बळी पडू नका, प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज

राज्यात ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४१, पुण्यात ७, ठाणे शहरात ७, औरंगाबाद शहरात ५, जळगावमध्ये ३, मीरा भाईंदरमध्ये २, नाशिक शहरात १ तर सोलापूर शहरामध्ये १ मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४७ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३८ रुग्ण आहेत तर २५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये ( ६६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ११३५ झाली आहे. आज नोंदविण्यात आलेल्या एकूण मृत्यूंपैकी २२ मृत्यू हे मागील २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,६१,७८३ नमुन्यांपैकी २,३१,०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३०,७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १५१६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,४३४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६०.९३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या