28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात 13 लाख 62 हजार लोकांनी स्वत:च केली कोरोनाची चाचणी

राज्यात 13 लाख 62 हजार लोकांनी स्वत:च केली कोरोनाची चाचणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात वाढत्यो कोरोनाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी जसे राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करत आहे तसेच राज्यातील सुजान नागरिकही प्रशासनाला सहकार्य करत आहेत. राज्यात स्वत:हुन कोरोनाची चाचणी करणाºया नागरिकांची लक्षणीय होत आहे हे विशेष. सर्दी, खोकला किंवा ताप ही लक्षणे असली तरी ही लक्षणे कोरोनाचीच आहेत का हे नागरिकांना स्वतःच लक्षणांवरून तपासता यावे यासाठी सरकारने सेल्फ असेसमेंट टूल तयार केले. सरकारच्या covid-19.maharashtra.gov.in या वेबसाइटकर स्वतःची चाचणी करून घेता येते. आतापर्यंत 13 लाख 62 हजार 733 लोकांनी अशा प्रकारे आपली स्वतःची चाचणी करून घेतली आहे. त्याचप्रमाणे महाककच, टेलिमेडिसीन हेल्पलाइनचाही लाभ हजारो लोकांनी घेतला असल्याचे कौशल्य विकासमंत्री नकाब मलिक यांनी सांगितले.

कोरोनासंदर्भातील सरकारच्या वेबसाईटकर नागरिकांसाठी स्वचाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोनाची शक्यता वाटत असल्यास या टूलच्या आधारे नागरिक स्वतः प्राथमिक स्वरुपाची स्वचाचणी करू शकतात. कोरोनाबाधीत असण्याची शक्यता घरबसल्या समजून घेऊ शकतात. त्वरित वैद्यकीय सल्ला आणि इतर संबंधित संपर्कांचा तपशीलदेखील या लिंकवर उपलब्ध आहे. अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या सहकार्याने हे टूल तयार करण्यात आले असल्याचे मलिक यांनी सांगितले.

टेलिमेडिसिन हेल्पलाईन

कोविडविषयक माहिती आणि मदतीसाठी 9513615550 ही टेलिमेडिसिन हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर फोन करुन तीन हजारांहून अधिक नागरिकांनी कोरोना संबंधित लक्षणांचे स्वत:चे स्क्रिनिंग करून घेतले आहे.

50 हजारांहून अधिक नागरिकांकडे महाकवच

रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणारे आणि त्यांचे क्वारंटाइन व्यवस्थापन करणारे महाकवच हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. या ऍपमुळे कोरोनाबाधित व्यक्तीचा मागील 21 दिवसांचा मागोवा (Location history), कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले हाय रिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्ट्सचे संपर्क क्रमांक, कोरोनाबाधित व्यक्तीने भेट दिलेली सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच हॉटस्पॉट्सची माहिती कळते. जीओ पेन्सिंगमुळे नागरिकांना एका मर्यादित क्षेत्रातच वावरण्याची मुभा असते. जेव्हा ही त्रिज्या नागरिक ओलांडतात तेव्हा ऍपद्वारे ही माहिती लगेच प्रशासनाला समजते. आतापर्यंत 50 हजार 132 लोकांनी महाककच ऍप स्वतःच्या मोबाईलकर डाऊनलोड केले आहे.

Read More  चिंता वाढली : औरंगाबादेत एका दिवसात तब्बल 202 नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या