32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home महाराष्ट्र कोरोना सुपर स्प्रेडर व सारीच्या रुग्णांचा शोध घेणार

कोरोना सुपर स्प्रेडर व सारीच्या रुग्णांचा शोध घेणार

एकमत ऑनलाईन

पुणे : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २१ फेबु्रवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सुपर स्प्रेडर शोधण्यापासून ते कॉन्टॅक्ट ट्रसिंग वाढवण्यापर्यंतचे निर्णय घेतानाच सारी तापाचे रुग्ण शोधण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी कोरोना रोखण्यासाठीचा ऍक्शन प्लॅनही तयार करण्यात आला. पुण्यातील कॉन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, खा़ गिरीश बापट, खा़ श्रीरंग बारणे, खा़ वंदना चव्हाण, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोनावर नियंत्रण ठेवा
कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिका-यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबवा. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करून नमुना तपासण्या वाढवा. आरोग्य कर्मचा-यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा, असे सांगून कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होऊन संसर्ग रोखण्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी त्यांनी फ्लू सदृश रुग्णांची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना पवार यांनी यावेळी केल्या.

त्रिसूत्री पाळा
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, असे सांगून पवार म्हणाले, २०० व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम होतील याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवावीत. मात्र अभ्यासिका निम्या क्षमतेने नियम पाळून सुरू राहतील याची खात्री करा. हॉटेल, बार रात्री ११ पर्यंतच सुरू राहतील याची दक्षता घ्या, असे सांगून रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी करा. वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सूट द्या. जिल्ह्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर तात्काळ सुरू करा. मास्क न वापरणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

फ्लू सदृश्य रुग्णांची कोरोना टेस्ट बंधनकारक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे. शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिका-यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करून नमुना तपासण्या वाढवा. आरोग्य कर्मचा-यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे

माघी वारीत वारक-यांना मठाबाहेर काढू नका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या