34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमहाराष्ट्रपुण्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर?

पुण्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर?

एकमत ऑनलाईन

पुणे : कोरोनाच्या रुग्णसंख्येचे आकडे दिवसेंदिवस नवे शिखर गाठत असल्याचे पाहायला मिळतेय. देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर स्थिती ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या बाबतीत पुणेदेखील आघाडीवर आहे. रोज समोर येणा-या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, हॉस्पिटल हाऊसफुल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आयसीयू आणि व्हेंटिलटेर बेडच्या बाबतीत तर पुण्यात संकटाला सुरुवातही झाली आहे. कारण सोमवारी सायंकाळचा विचार करता पुणे मनपा हद्दीत एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याची स्थिती पाहायला मिळाली.

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्यात जवळपास २१ हजारांहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पण यापैकी व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्या ही केवळ ४८९ आहे. सोमवारी सायंकाळची स्थिती पाहता यापैकी एकही बेड शिल्लक नसल्याचे समोर आले. रात्री उशिरानंतर यापैकी काही बेड उपलब्ध झाले. पण आता हे बेड फुल व्हायला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

आयसीयू बेडचा विचार करता पुण्यात मनपा आणि खासगी रुग्णालयात मिळून एकूण ४३० आयसीयू बेड आहेत. त्यापैकी सोमवारी रात्री केवळ २ उपलब्ध होते. त्यामुळे आयसीयू बेडची स्थितीही गंभीर असल्याचे पाहायला मिळतेय. व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची पुणे महानगर विभागातील रुग्णालयात मात्र उपलब्धता असल्याचे पाहायला मिळातेय. सोमवारी या रुग्णालयामध्ये ९० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होते.

पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व खासगी रुग्णालयांमध्येही जवळपास २३ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथकं गरजू रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी काम करतात. पुणे महानगरपालिका आणखी १००० बेडची व्यवस्था करण्याच्या तयारीत असून त्यापैकी ६० आयसीयू बेड असतील. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला, त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

सर्वच यंत्रणांनी जबाबदारी लक्षात घेऊन काम करावे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या