22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. कामकाज सल्‍लागार समितीच्या बैठकीतच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

दिल्‍ली व अन्य काही राज्‍यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मुंबई व महाराष्‍ट्रात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला होता. परंतु दिवाळीनंतर देखील कोरोनारूग्‍ण संख्या चांगलीच आटोक्‍यात आणण्यात राज्‍य सरकारला यश आले होते. मात्र आता दिवाळीनंतर रूग्‍ण संख्या वाढते आहे. दिल्लीतील स्थितीमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात राज्‍यातील परिस्‍थितीचा आढावा घेऊन अधिवेशनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशन दरवर्षी उपराजधानी नागपूर येथे होते. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून मुंबईतच घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता राज्‍यातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती व्यक्‍त केली जात आहे. प्रशासन त्‍यादृष्‍टीने सज्‍जही झाले आहे. त्‍यामुळे हिवाळी अधिवेशनाबाबतही प्रश्नचिन्ह आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्‍लागार समितीच्या बैठकीतच घेण्यात येईल.

रुमा बचत गटाच्या गोधडीची ‘अ‍ॅमेझॉन’वर भरारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या