29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यातील तुरूंगात कोरोनाचं थैमान

राज्यातील तुरूंगात कोरोनाचं थैमान

एकमत ऑनलाईन

मुंबई: राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा हा वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासात ५८ हजार ९५२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसांपासून बड्या नेत्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून आता महाराष्ट्रातील तुरूंगातही कोरोनाचे थैमान सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

सध्या राज्यभरातील तुरूंगात कोरोनाचे २८४ सक्रिय रूग्ण आहेत. यामध्ये १९८ कैदी तर ८६ तुरूंग कर्मचा-यांचा सहभाग आहे. यासह या जीवघेण्या कोरोनाने १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ७ कैदी आणि ८ तुरूंग कर्मचारी असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.

दरम्यान, तुरूंगात देखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याने तुरूंगातील कैद्यांसह कर्मचा-यांना कोरोना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत १ हजार ३२६ कैद्यांना तर ३ हजारांहून अधिक तुरूंगातील कर्मचा-यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या