24.4 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeमहाराष्ट्रजळगावच्या लग्नात कोरोनाचा धुमाकूळ...

जळगावच्या लग्नात कोरोनाचा धुमाकूळ…

एकमत ऑनलाईन

जळगाव : राज्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अशातच जळगाव तालुक्यातील एका लग्नाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. नवरदेव, नवरदेवाचे वडील, नवरदेवाचे भाऊ-भावजय यांना कोरोनाने गाठले आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह त्याचे वडील, भाऊ, भावजयी आणि अन्य एक जण असे पाच जण कोरोना बाधित निघाले आहेत. शिरसोली गावात दोन दिवसांत सात बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

१६ फेब्रुवारीला विवाह सोहळा आटोपल्यानंतर नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांना कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाने बाधित असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. तसेच संशयित असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

वाळू मफियांविरूध्द महसूल विभागाची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या