31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रकोरोनामुक्तीचा दर ९० टक्क्यांवर, दिवसभरात केवळ चार हजार नवे रुग्ण !

कोरोनामुक्तीचा दर ९० टक्क्यांवर, दिवसभरात केवळ चार हजार नवे रुग्ण !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट पुर्णतः टळले नसले तरी आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९०.३१ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासात राज्यात केवळ ४ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली असून १०हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात घातलेले एकेक निर्बंध उठवले जात असल्याने पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढेल अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण आले आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत रोज २० ते २५ हजार नवीन रुग्णांची भर पडत होती. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही तीन लाखाच्या पुढे गेली होती. परंतु दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा टप्प्याटप्प्याने कमी होत आज चार हजारापर्यंत खाली आला. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.३१ % एवढे झाल्याने उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १ लाख १८ हजारापर्यंत खाली आली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण एकूण ९० लाख ६५ हजार १६८ लोकांची तपासणी करण्यात आली असून १६ लाख ८७ हजार ७८४ (१८.६२ टक्के ) लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. यापैकी १५ लाख २४ हजार ३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज १०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामुळे मृतांची एकूण संख्या ४४ हजार १२८ झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.६१ % एवढा आहे. सध्या राज्यात २५ लाख ३३ हजार ७८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये, तर १२ हजार १९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

भूम तालुक्यातील आंबी येथिल शेतकऱ्यांचा मावेजा साठी रास्ता रोको आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या