19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत कोरोनाग्रस्ताची हत्या, पाच दिवसांनी मृतदेहच रुग्णालयातून गायब

मुंबईत कोरोनाग्रस्ताची हत्या, पाच दिवसांनी मृतदेहच रुग्णालयातून गायब

एकमत ऑनलाईन

ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने चिंता वाढली

मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात कोरोनाबाधित रुग्णाची हत्या करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे हत्येच्या पाच दिवसांनी या रुग्णाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयातून गायब झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवंडीतील शिवाजी नगर येथे राहणाऱ्या या व्यक्तीवर 3 जून रोजी चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर या व्यक्तीला तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ज्यावेळी या व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणलं, तेव्हा तो जिवंत होता. मात्र, काहीच वेळात वेळात त्याचा मृत्यू झाला.

Read More  एकाच दिवशी लातूर शहरातील १० व्यक्तींची कोरोनावर मात

या व्यक्तीची जोपर्यंत कोरोनाची टेस्ट होत नाही, तोपर्यंत त्याचं शवविच्छेदन करण्यात येणार नाही, अशी भूमिका राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाच्या डॉक्टरांनी घेतली . त्यामुळे 3 जून रोजी मृत व्यक्तीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. तोपर्यंत मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला. मात्र, आज (8 जून) त्या व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल आला. तो कोरोना पॉझिटिव्ह होता. त्यामुळे या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णालयाचे कर्मचारी मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेले. तेव्हा, या व्यक्तीचा मृतदेह गायब असल्याचं कळालं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतदेहाचा शोध सुरु आहे. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने चिंता वाढली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या