18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रमहामंडळाला मिळणार ५ हजार इलेक्ट्रिक बस

महामंडळाला मिळणार ५ हजार इलेक्ट्रिक बस

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने बासष्ठी पार केली आहे. मध्यंतरी संप आणि कोरोना काळात एसटीचे कंबरडे मोडले. एसटी महामंडळ यातून आता सावरायचा प्रयत्न करीत आहे. सरकारदेखील यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

यातच एक पुढचे पाऊल म्हणून आता राज्य परिवहन मंडळासाठी ५१५० इलेक्ट्रिकल बसेस येणार आहेत. त्याचबरोबर ५ हजार डिझेल बसेसचे सीएनजीवर रुपांतर केले जाणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक यासाठी राज्याला सहकार्य करणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे शिष्टमंडळ सध्या राज्याच्या दौ-यावर आहे. या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेटून चर्चा केली.
एडीबी बँकेच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले की, राज्यात नदी जोड प्रकल्प, वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठीचा प्रकल्प तसेच राज्य परिवहन मंडळासाठी ५१५० इलेक्ट्रीकल बसेस, त्याचबरोबर ५ हजार डिजेल बसेसचे सीएनजीवर रुपांतर करणे या प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळातील सदस्यांनी राज्यात दौरे करून विविध प्रकल्पांच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधल्याचे यावेळी सांगितले.

सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समूह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्रेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या