37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रभ्रष्टाचार हा व्यवस्थेचाच भाग; राज्याच्या पोलिस महासंचालकांचे धक्कादायक विधान

भ्रष्टाचार हा व्यवस्थेचाच भाग; राज्याच्या पोलिस महासंचालकांचे धक्कादायक विधान

एकमत ऑनलाईन

नागपूर : राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी भ्रष्टाचाराबाबत धक्कादायक विधान केले असून, भ्रष्टाचार हा व्यवस्थेचाच भाग झाला आहे. भ्रष्टाचाराचा पुरस्कार करणे शक्यच नाही, असेही नगराळे म्हणाले. पोलिस आणि महसूल विभागातील कर्मचा-यांची संख्या बघता अन्य विभागाच्या तुलनेने लाच प्रकरणात पोलिस विभागात अटक होणा-यांची टक्केवारी ही कमीच असल्याचे नगराळे यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचार हा केवळ पोलिस , महसूल व वन विभागातच आहे असे नाही. भ्रष्टाचाराचा नायनाट करणे कठीण आहे. तो व्यवस्थेचाच एक भाग झाला आहे. भ्रष्टाचा-यांना अटक करून त्यांना शिक्षा करणे हाच एकमेव पर्याय आहे. नगराळे यांच्या विधानाने उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचा-यांच्या भुवया उंचावल्या. नागपूर शहर व नागपूर परिक्षेत्रातील कायद व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर नगराळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात नगराळे यांनी सदर विधान केले.

भ्रष्टाचाराचा नायनाट करणे कठीण
महसूल व पोलिस विभागात लाच घेण्याची स्पर्धाच असल्याचे आकडेवारी सांगते, याकडे लक्ष वेधले असता नगराळे म्हणाले, भ्रष्टाचार हा केवळ पोलिस , महसूल व वन विभागातच आहे असे नाही. भ्रष्टाचाराचा नायनाट करणे कठीण आहे. तो व्यवस्थेचाच एक भाग झाला आहे. भ्रष्टाचा-यांना अटक करून त्यांना शिक्षा करणे हाच एकमेव पर्याय आहे.

भ्रष्टाचाराचा प्रश्न आपल्या अखत्यारितला
भ्रष्टाचार करणारा वरिष्ठ अधिका-यांना विचारून भ्रष्टाचार करीत नाही. त्यामुळे पोलिस कर्मचा-याने लाच घेतल्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात येते. तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक लाच प्रकरणात आढळल्यास पोलिस उपायुक्तांची बदली करावी, असे म्हणता येणार आहे. हा आपल्या अख्तेरित्या असलेला प्रश्न आहे. त्यामुळे तो कसा सोडवावा हे मी सार्वजनिकरित्या सांगणे संयुक्तिक होणार नाही. कोरोनामुळे राज्य पोलिस दलातील ३३९ पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचे निधन झाले. अनुकंपातत्त्वावर त्यांच्या पाल्यांना पोलिस विभागात नियुक्ती देण्यात येत आहे. नागपूर पोलिस दलात गुरूवारी ३० पोलिस पाल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार उपस्थित होते.

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या