24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमहाराष्ट्रनोव्हेंबरपासून कापूस खरेदी सुरू होणार

नोव्हेंबरपासून कापूस खरेदी सुरू होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.२२ (प्रतिनिधी) कापूस खरेदीचे योग्य नियोजन करून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कापूस खरेदीला सुरवात करावी. कापूस खरेदी केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात यावेत, अशा सूचना पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी दिल्या. दरम्यान शेतकऱ्यांना कापसाचे पैसे वेळेत देण्यासाठी पणन महासंघाला ६०० कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कापूस खरेदी नियोजनाबाबत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज आढावा बैठक झाली.ज्या तालुक्यात सर्वाधिक कापूसपेरा आहे तिथे प्रत्यक्ष खरेदी लवकर सुरू करण्यासाठी नियोजन करावे, असे पाटील यांनी सांगितले. यंदा खरीप हंगाम ३९.३७ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला आहे. मागील वर्षी ४२.०८ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला होता. यावर्षी कापूस पेरा ६.४४ टक्के घटला असली तरी सद्यस्थितीत कापूस पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. त्यानुसार राज्यात ८०-८५ लाख गाठी एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार योग्य नियोजन करून खरेदीकेंद्र नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत करावी, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

बैठकीला सहकार आणि पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे संचालक सतीश सोनी, सीसीआयचे महाव्यवस्थापक अतुल काला आदी उपस्थित होते.

कापसाच्या चुकाऱ्यासाठी ६०० कोटी
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत किमान आधारभूत दराने कापूस खरेदी करण्यसाठी व कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी पणन महासंघाने घेतलेल्या ६०० कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या